नागरी या गावात भव्य शाखेचे उदघाटन #chandrapur #warora


वरोरा:- टायगर ग्रुप संस्थापक वस्ताद जालींदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुन 2023 ला वरोरा तालुक्यातील नागरी या गावामधे टायगर ग्रुप नागरी शाखा-नागरी चे भव्य उदघाटन करण्यात आले, टायगर ग्रुप वरोरा चे युवा समाजसेवक,तडफदार नेतृत्व रिषभ भाऊ रठ्ठे,आणी मित्रपरिवार यांचे नागरी या गावात आगमन होताच फटाकांच्या आतिषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

स्वागत होताच नागरी गावातील चौकात असलेल्या महापुरूषांच्या,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून नागरी या गावात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, रॅलीमध्ये नागरी गावातील युवा पिढी,पुरुष ,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.संपूर्ण नागरी गावातून रॅलीचे आयोजन करण्यात आले.नागरी गावकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत रॅलीत सहभागी झाले. रॅली नंतर सभेचे आयोजन गुरुदेव चौक,नागरी येथे करण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी टायगर ग्रुप वरोरा चे युवा सामाजिक कार्यकर्ता रिषभ भाऊ रठ्ठे मारोती भाऊ नामे ,टायगर ग्रुप वणी चे नरेश भाऊ ठाकरे,प्रतिक भाऊ गौरकर,टायगर ग्रुप वनी चे संपूर्ण सदस्य,टायगर ग्रुप मा माढेळी चे मुकेश भाऊ पाटील,टायगर ग्रुप पांझूर्नी चे प्रसाद भाऊ गमे,अजय भाऊ जांभुळे,टायगर ग्रुप वरोरा चे प्रमुख सदस्य प्रीतम भाऊ ठाकरे,बाळा चाभारे ओम कार्लेकर, वैभव टिपले,महेंद्र तामगाडगे,रोशन कुळसंगे,बादल ठावरी टायगर ग्रुप पांझूर्नी चे सर्व सदस्य, टायगर ग्रुप शाखा नागरी चे शाखा अध्यक्ष भास्कर भाऊ कोसूरकर,उपाध्यक्ष अमित भाऊ थाटे,नागरी ग्रामीण प्रमुख अजय भाईगुप्ता,सचिव अनिल भाऊ डोंगरे,आणी संपूर्ण टायगर ग्रुप नागरी सदस्य उपस्थित होते. रिषभ भाऊ रठ्ठे यांच्या कामाची दखल घेत टायगर ग्रुप नागरी चे सर्व सदस्यांनी रिषभ भाऊ रठ्ठे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.टायगर ग्रुप वनी च्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.टायगर ग्रुप वरोरा च्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भाऊ डोंगरे यांनी केले.अध्यक्षीय भाषणात रिषभ भाऊ रठ्ठे यांनी टायगर ग्रुप चे कार्यावर चर्चा केली,कुठे रक्तदान,श्रमदान,गरजू लोकांना धान्य वाटप,अनाथांना किराणा वाटप,रुग्णांना फळ वाटप,ब्ल्याकेट वाटप या प्रकारे टायगर ग्रुप च काम आणी महत्व नागरी गावातील लोकांना पटवून दिले.जास्तीत जास्त युवा पिढींना समाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी,आणी तरुण पिढी व्यसनापासून कशी दूर राहिली पाहिजे यावर मार्गदर्शन रिषभ भाऊ रठ्ठे यांनी केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरा-घरात पोहचले पाहिजे यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या