Top News

चंद्रपूरात रखरखत्या उन्हात मनसे शेतकरी सेना धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर #chandrapur #mns


चंद्रपूर:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन मनसे शेतकरी सेनेतर्फे जन आक्रोश मोर्चा आंदोलन ७ जून रोजी करण्यात आले. मनसे शेतकरी सेनेचे आंदोलन वरोरा नाका पासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा मनसे शेतकरी जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात निघाला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी नोंदविला होता.


परसोडा, काठोडा, रायपूर या गावांत आरसीसीपीएल कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येक सातबारा, एक नोकरी, ४० लाख रुपये एकर देण्यात यावे, जोपर्यंत एकमुस्त जमिनी घेणार नाही, तोपर्यंत कोणतेही उत्खनन करु नये, दलालामार्फत कोणताही खरेदी व्यवहार करू नये, अवकाळी पाऊस, जमीन खरडणे, गारपीट, अतिवृष्टीचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे, सीएसआर फंडाचा वापर योग्य ठिकाणी करावा, पीकविम्याची रक्कम कुठलीही जाचक अट न टाकता शेतकऱ्यांना पीकविमा त्वरित देण्यात यावा, शेती तक्रार निवारण्यासाठी क्विक रिस्पॉन्स यंत्रणा सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मनसे शेतकरी जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

यावेळी ॲड. मंजू लेडांगे जिल्हाध्यक्ष विधी विभाग मनसे, सुनिल गुडे जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष मनसे, रघुनाथ मडावी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना, महेश वासलवार उपशहर अध्यक्ष मनसे, स्वप्निल पेटकर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना सावली, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने