प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकू हल्ला #chandrapur #nagpur

Bhairav Diwase
0

नागपूर:- अल्पवयीन मुला-मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले. मात्र, हे प्रेयसीच्या आईला कळताच तिने मुलीला त्याच्याशी न भेटण्याची तंबी दिली. त्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या आईवर चाकू हल्ला केला. ही खळबळजनक घटना कपिलनगर पोलिस हद्दीत घडली. (Lover's knife attack because girlfriend's mother did not let her speak)

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुला-मुली यांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकमेकांना भेटू लागले. ही बाब मुलीच्या आईला कळली. तिने मुलीला मुलाशी बोलणे बंद करण्यास सांगितले. काही दिवसांनी तिला नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठविले. ही बाब प्रियकराला कळली. त्यामुळे तो भडकला. त्याने शनिवारी (ता.२७) रात्री प्रेयसीचे घर गाठले.

मुलीचे आई-वडिलांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यावेळी ते एका कार्यक्रमाला जात होते. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रियकर अधिकच संतापला. तेव्हा चाकूने मुलीच्या आईवर हल्ला करीत, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्रांनी त्याला अडवित घराची तोडफोड केली. त्यांना पुन्हा धमकी देत, ते दोघेही पसार झाले. शेजाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिननगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)