"त्या"आरोपींना फाशीची शिक्षा द्या #chandrapur #pombhurna


वंचित बहूजन आघाडी तालुका पोंभुर्णाचे ठाणेदारांना निवेदन

पोंभुर्णा:- नांदेड जिल्ह्यात बोंढारी हवेली येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अक्षय भालेराव याची जातीयवादी गावगुंडांनी हत्या केली. त्या घटनेचा तिव्र निषेध करीत हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडी तालुका पोंभुर्णा चे वतीने पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागण्यांचे निवेदन पाठवीण्यात आले. (Give death sentence to "those" accused)

निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी केल्याचा राग जातीयवादी गावगुंडांनी मनात धरून निघ्रूनपणे हत्या करणे ही घटना मानवतेला कलंकित व काळीमा फासणारी आहे.अशा विकृत मानसीकतेच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा,नांदेड जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून शासनाने घोषित करावा,अक्षय भालेराव च्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरीत घेण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

सदर प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहूजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आद. एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

सदर निवेदन ठाणेदार श्रि.येणगंटीवार साहेबांना सादर करतांना वंचित बहूजन आघाडी पोंभुर्णा तालुका अध्यक्ष विलास रामगीरकार, महासचिव रवी तेलसे, पोंभुर्णा शहर अध्यक्ष राजू खोब्रागडे, नगरपंचायत पोंभुर्णा चे नगरसेवक अतुल वाकडे, नगरसेविका रिना उराडे, कुंदन जिवने, अनिल वाकडे, अजय उराडे, निश्चल भसारकर,बुद्धेश्वर गोवर्धन यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत