महावितरण कंपनीने भरमसाट विज दर वाढ कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा अन्यथा मनसे तिव्र आंदोलन करणार #chandrapur

Bhairav Diwase
0

मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या मार्गदर्शनात व शहर सचिव सुमीत करपे यांच्या नेतृत्वात केले निदर्शने

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात विज उत्पादन मोठया प्रमाणात केले जाते. विज उत्पादन करतांना निर्माण होणाऱ्या प्रदुषणामुळे मानवी जीवनास घातक असे प्रदुषण होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्यावर होणान्या परिणामास जनतेला अधिकचा भुदंड बसत आहे. अशातच विज कंपनीने भरमसाठ विज दर वाढ केल्याने येथील नागरिकांना विज बीलात वाढ होत असल्याने विज बील भरणे मुश्कील झाले आहे. चंद्रपूर येथे उन्हाचा तडाखा सुरु आहे. विज केंद्रामुळे येथील वातावरण गरम असते. यामुळे पंखा, कुलर, ए.सी. शिवाय चंद्रपूर शहरात जिवंत राहणे शक्य नाही. विज बिलाचा अतिरीक्त भुर्दड येथील जनतेला सहन करावा लागत आहे.


महावितरण कंपनीने नुकतीच वीज दरात वाढ केली आहे. या विज दर वाढीचा जनतेने विरोध केला आहे. महावितरण कंपनीने विज चोरी बंद करावी तसेच विज उत्पादनात भ्रस्टाचार बंद केल्यास वीज उत्पादनाचा खर्च कमी होऊन वीजेचा दर कमी होऊ शकतो व गोरगरीब जनतेला दिलासा मिळू शकतो. सदर निवेदनातून महावितरण कंपनीला विनंती आहे की वीज दर वाढ रद्द करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांना घेऊन जन आंदोलन छेडणार याची सर्वस्वी जबाबदारी विजवितरण कंपनीची राहणार आहे. निवेदनातील मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा चंद्रपूर तर्फे विज वितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्यात येईल. याकरीता मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या मार्गदर्शनात व शहर सचिव सुमीत करपे यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता, महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

या निषेधार्थ आंदोलनात सहभागी महेश वासलवर, संगीता ताई धात्रक, राकेश हनुमंते, बाळा चंदनवार, बंटी कास्तवार, मिथुन महाकुलकर, विकी हत्तीमारे, पराग खोब्रागडे, श्रीकांत सुंदरगिरी, अजय दामिनी, सुरेंद्र साव, अमोल साओ, दीपक मेश्राम, राजेश भट्टी, सोनी भट्टी आदी मनसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)