चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात चोरांनी ५ घरे फोडली; अंदाजे २,७२,५०० रुपयांच्या ऐवजाची चोरी #chandrapur #theft

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात चोरीच्या घटनेत वाढ होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील सीनर्जी वार्ड कारनेशील बिल्डिंग कोसारा परिसरात अज्ञात चोरांनी ५ घरे फोडून चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण अंदाजे २,७२,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Unknown thieves broke into 5 houses in Chandrapur district; Theft of compensation worth approximately Rs.2,72,500)


चंद्रपुर सीनर्जी वार्ड कोसारा येथील जयकुमार नामदेव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि.9/06/23रोजी सायंकाळी 05/00वा दरम्यान आपले स्वताचे फोरव्हीलर गाडीने मुळ गावी छींदवाडा येथे सासुरवाडी येते गेले असता दि. 12/06/23 रोजी जयकुमार नामदेव यांना शेजारी राहणारे यामीनी भटारकर यांनी फोन करुन सांगीतले की तुमचे प्लॉट चा समोरील दरवाजा उघडा आहे तरी तुमच्या घरी चोरी झालेली दिसत आहे तेव्हा जयकुमार नामदेव हे चंद्रपुर सीनर्जी वार्ड कोसारा येथे आपले प्लॅटवर जावुन पाहीले असता दोन्ही आलमारी मधील सामान व कपडे अस्ताव्यस्त टाकलेले दिसले तेव्हा जयकुमार नामदेव आलमारी मधील लॉकर चेक केले असता 1) सोन्याची नेकलेस 32 ग्रॅम कीमत 1,20,000रु 2) सोन्याची अंगुठी 2.5 ग्रॅम की 5000रु 3) सोन्याचे कानातले जुमके एक जोड़ 2.5 ग्रॅम कीमत 5000रु 4) सोन्याचे मनी 20 नग की 10,000रु 5) सोन्याची जीवती 1 ग्रॅम की 2500रु 6) सोन्याची बारी 2नग 1 ग्रॅम किंमत 2500रु 7) चांदीचे एक जोड 500 ग्रॅम की 20,000रु 8) चांदीचे जोडवे अनग 10 ग्रॅम 3000रु9) चांदीचे प्लेट, चांदीचे ग्लास, चांदीचे चार वाट्या, दोन चम्मच, 11 सिके चांदीचे, चांदीची लक्ष्मीची मुर्ती व गणेशची मुर्ती असा एकून 500 ग्रॅम कि, 20,000 रु. 10) नगदी 70,000 रुपये असा एकुन 2,58,000 रु. चा माल कोणतरी इसमाने दी. 11/06/2023 ते 12/06/2023 चे रात्रो दरम्यान फ्लॉट चा दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला, चोरी केली आहे.

तसेच आमचे बील्डींग मधे राहणारे मनोजकुमार वासुदेव सिध्दशेट्टीवार यांचे घराचा दरवाजा सुध्दा उघडा दिसला असुन त्यांच्या आलमारी मधुन अंदाजे नगदी रुपये 4000 रु. चोरून नेले. 1. तसेच आमच्या सिनर्जी वार्ड सोसायटी मधे राहनारे 1) श्री. किशोर किसन राऊत, वय 59, रा. रो. हाऊस न 44. 2) सिध्दार्थ गोमाजी फुलझेले, रा. रो. हाउस न, 23, याचे पण राहते घराचे लॉक तोडुन चोरी झालेली आहे. त्याच प्रमाने मोहम्मद निशाद मो. सुरआली, वय 30 वर्ष, रा. रो. हाऊस नं. 24. यांचे घराचे लॉक तोडुन त्यांचे घरातील 01) 1 सोन्याची अंगठी वजन अंदाजे 2 ग्रॅम की. 6000 रु. 2) चांदीचे चाळ दोन नग की. 1500 रु. व नगदी 3000 रु. चोरी झाल्याचे माहीत पडले तरी दि. 11/06/2023 चे रात्रौ 23.00 वाजता पासुन ते 12/06/2023 चे 14.00 वाजता दरम्यान अज्ञात इसमाने सिनर्जी सोसायटी मधील फ्लॉट नं. 105 तसेच रो. हाउस न. 44, 23, 24 मधील घराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून अंदाजे 2,72,500 रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेलेला आहे.

अज्ञात चोरा विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार दाखल करण्यात आले आहे. ‌अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)