मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती Coromandel Express collides with a freight train; Many are feared dead

Bhairav Diwase
0
हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत शेकडो प्रवासी जखमी झाल्याची आणि काहीजण दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. (Coromandel Express collides with a freight train; Many are feared dead)

रेल्वेमंत्र्यांची मोठी मदत जाहीर! मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख



ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनच्या स्लीपर बोगी वगळता संपूर्ण ट्रेन(17-18 डब्बे) रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन एका मालगाडीला धडकली आणि नंतर रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्लनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही ट्रेन एकाच पटरीवर आल्याची माहिती आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी मदतीने बचावकार्य सुरू आहे.

मोठी अपडेट! अपघात दोन नाही तर तीन ट्रेनचा, 50 पेक्षा जास्त मृत्यू?

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने सांगितले की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय ट्रॅक साफ करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या, याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)