Top News

विकासकामाचे बोल मिरवणाऱ्या चष्म्यातून भकास कामे दिसत नसतात -न. पं. विरोधी पक्षनेता आशिष कावटवार

पोंभूर्णा शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांना गेले अल्पावधीत तडे, विकास कामं फक्त कागदावरच

पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरातील विकासाच्या नावाखाली कोट्यावधीचे जे काम झाले आहेत ते झालेच आहेत या बद्दल शंका नाही. मात्र प्रमाणतेपेक्षा अधिक पैसे असलेले कामं सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले त्यांचे काय. कुणी तरी फलाण्याने काम आणलं हे सांगण्यापेक्षा ते चांगले केलो हे सांगणे महत्वाचे आहे. काम आणणे हे ज्या त्या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीचं कामच आहे. झालेल्या कामाची ओळख हि तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.जर ते कामं गुणवत्तेत उतरले असते तर आम्हच्या सह अनेकांनी त्यांचं कौतूकच केले असते .पण असे काम झालेले उदाहरण हे बोटावर मोजण्या सारखेच आहेत.मग जे निकृष्ट झाले ते कामं जनतेनी डोळे बंद करून बघायचे का.फक्त पाच-सात फुटाची सिलिंग कोसळली असं म्हणून पडदा झाकण्यापेक्षा जर त्या सभागृहात सभा सुरू असताना कुणाच्या डोक्यावर पडली असती अन् अनपेक्षित काही हानी झाली असती तर भक्तजण त्यांची जबाबदारी घेतले असते का.जो सभागृहात उपस्थित राहतो त्यालाच दिसतोय ९ कोटी ९९ लाख रुपये खर्चून बांधलेली भव्यदिव्य इमारत आज गळतीला लागली आहे.

नगरपंचायतच्या वर लाखो रुपये खर्च करून बांधलेला डिझायनर टॉप छत गळत आहे.एवढंच नाही तर दिव्यांगांना जी लिफ्ट सुरू करण्यात आली ती लिफ्ट बंद झाली आहे.ती फक्त शोभेसाठी उरली आहे.मुख्याधिकारी क्वार्टर गळत आहे, नव्याने बांधलेले सभागृह गळत आहेत.नगरपंचायत सांस्कृतिक भवन भाड्याने दिलेल्या (कार्पेट क्लस्टर) ह्याची सिलिंग पडत आहेत.तिथे पन्नास महिला कामं करतात जर त्यांच्या डोक्यावर सिलिंग पडेल तर त्यांना दुखापत व अनुचीत घटना घडल्यास विकास पुरुष जबाबदार राहतील का.अनेक काम बंद आहेत त्याकडे आपले लक्ष नाही.अगरबत्ती प्रकल्प,टुथ पिक प्रकल्प,मधमाशी पालन प्रकल्प सर्व बंद आहेत.जनतेच्या पैसानी कोट्यावधी रुपये खर्च करून ईको- प्रो उद्यान निर्मिती ,गाव तलावची सुशोभीकरणची अस्वस्था काय झाली आहे ते काम गॉगल मधून दिसणार नाही जवळ जाऊन बघितले तर दिसून येईल.जे काम बंद आहेत ते तरी सुरू करा म्हणजे तुमचं काम काही तरी सुरू आहे हे तरी समजेल.पण कोठलं काय सर्व बंद.फक्त पैश्याची उधळपट्टी केली जात आहे.

सरकार ज्या तिजोरीतून पैसे खर्च करते ते पैसे जनतेचे आहे त्यावर स्वतःचे पैसे असल्यासारखे कोणत्याही पुरुषांनी हक्क गाजवू नये.काम निकृष्ट होईल तर सर्वसामान्य जनता आवाज उठवणारच आहे. शहरातील विविध कोट्यावधी रुपयांच्या कामांचे लेखा परीक्षण व गुणवत्ता तपासणी झाले तर सत्य समोर येईलच. किती यात गोलमाल आहे.किती भ्रष्ट्राचार झाला आहे.त्या सर्व कामाचा हिशोब सर्वसामान्य जनता मागणार.हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.भक्त हे भक्तीत गुंग राहतील तरी चालेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने