मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकारला समर्थन आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिंदे सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्व राजकीय भूंकपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा राजकीय भूकंप नव्हे, विश्वगौरव, देशगौरव, नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करत या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी जेव्हा लोक साथ देत असतात, तेव्हा ती आनंदाची बाब आहे, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे. देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कोणी एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.