माजी नगरसेवकांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- बंद घरात जुगाराचा खेळ सुरु असल्याच्या माहितीवरून पडोली पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता एकूण 17 आरोपींना जुगार खेळताना अटक करण्यात आली. ही कारवाई कोसारा फाटा ते छोटा नागपूरदरम्यान रस्त्याच्या बाजुला असलेल्या माजी नगरसेवक करीमलाला काझी यांच्या भंगार दुकानावर करण्यात आली.

कोसारा फाटा ते छोटा नागपूर दरम्यान रस्त्याच्या बाजुला करीमलाला काझी यांचे भंगार दुकान असून, त्या भंगार दुकानात करीमलाला काझी हा जुगार भरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता, भंगार दुकान मालक करीमलाला काझी हा काही इसमांना कट पत्यावर पैश्याची बाजी लावून जुगाराचा खेळ खेळवत असल्याचे आढळून आले.

आरोपींची अंगझडतीत घेतली असता 37 हजार रुपये नगदी, 12 भ्रमणध्वनी 1 लाख 32 हजार रुपये किंमत, 7 मोटारसायकल किंमत 3 लाख 90 हजार रुपये असा एकूण 5 लाख 59 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. आरोपींविरुद्ध पडोली पोलिस ठाण्यात अप क्र. 243/23 कलम 4, 5, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम सहकलम 109 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू सहायक उपविभागीय पोलिस अधिकारी नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुधीर मत्ते, मनोहर रामटेके, सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे आदींनी केली.

#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news  #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)