(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील आष्टी (काकडे) गावातील गावशिवरात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना दि.३१ रोजी सोमवारला सकाळी उघडकीस आली.
सदर वाघीण ही वयस्क असून ती अंदाजे चार ते पाच वर्षाची आहे. विजेच्या स्पर्शाने या वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे खरे कारण शवाविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल. सकाळी काही गावकऱ्यांना ही वाघीण मृत्युमुखी पडलेली दिसल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर भद्रावती वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भद्रावती वनविभाग करीत आहे. हा आठवडा जिल्ह्यातील वाघांसाठी घात वार ठरला असून जिल्ह्यात जवळपास तीन वाघांचा मृत्यू या आठवड्यात झालेला आहे.
#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment #Trending #Trendingnews #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens #ShoheiOhtani #TylerChilders #RandyMeisner #Wordlehint #PostMalone #ZionWilliamson #NancyMace #Chivas #JalenRamsey #googleadsense #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide