देव तारी त्याला कोण मारी : सुदैवाने बालिका बचावली #Chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

नवीन बस स्टॉप समोरील घटना

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भद्रावती येथे अचानक मुसळधार पाऊस कोसळला तेव्हा येथीलच ८ वर्षाची बालिका बस स्थानक समोरील नाली मध्ये पडली व ती बंदिस्त नालीतून वाहून गेली. जवळपास ४०० ते ५०० फुट अंतरावर पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. तीने एका नाली वरील फरशीला धरून वाचवा-वाचवा म्हणून टाहो फोडला. अशातच तिथे एक देवदूत अवतारला. ऑटो चालक छगन बुरडकर असे त्याचे नाव आहे. त्याला तिच्या हाताची बोट दिसली. त्याने लगेच तिच्या बोटांना पकडून बाकी लोकांना बोलाविले. त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी नाली वरील सिमेंट काँक्रेटचे झाकण उचलून त्या मुलीला बाहेर काढले.मात्र यातून ती बालिका सुदैवाने बचावली. त्या बालिकेच्या आई-वडिलांनी छगन व मदत करणाऱ्या देवदूतांचे आभार मानले.म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी अशी आज प्रचिती घडली. आणि आज एक मुलगी आपले भावी जीवन जगण्यात यशस्वी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)