भद्रावतीत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन #bhadrawati
भद्रावती:- दिनांक 03 ऑक्टोबर 2023 ला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा परिषद ,चंद्रपुर , चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, तालुका क्रीडा समिती, भद्रावती व ॲमेचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपूर डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती तालुका स्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली.

याप्रसंगी स्पर्धा मुख्य रेफरी रूपाने अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे संस्थापक व सचिव रेंशी दुर्गराज एन रामटेके, स्पर्धा रेफरी रूपाने राजुरा तालुका कराटे असोसिएशनचे सचिव सेन्सई बंडू करमनकर, कोरपना तालुका कराटे असोसिएशनचे सचिव सेन्सई संदीप पंधरे ,तालुका क्रीडा संयोजक श्री प्रकाश देरकर,स्पर्धा मुख्य अधिकारी प्रा.संगीता बाम्बोडे मॅडम, सौ.लता इंदूरकर मॅडम, भद्रनाग स्पोर्ट्स अकादमी चे डायरेक्टर श्री पांडुरंग भोयर यांच्या सह विविध शाळांचे कोच, शारीरिक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


या संपुर्ण स्पर्धेचे नियोजन क्रीडा मार्गदर्शक प्रा संगीता बाम्बोडे मॅडम,क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख विवेकानंद महाविद्यालय , भद्रावती यांनी केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे पदाधिकारी व तांत्रिक अधिकारी बंडू करमनकर, करण नेवारे,क्रिश भोस्कर, संदीप पंधरे, विकास दुर्योधन, सौर्या रामटेके, हरिप्रिया बाभुलकर, दिव्या गेडाम, रितिका बोस, आर्य कामरे,रुचिका येरने, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या