Click Here...👇👇👇

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अण्णा राधारप यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथांना भेट वस्तू वाटप #chandrapur

Bhairav Diwase

राजुरा:- राजुरा (रामपूर)येथील स्वामी विवेकानंद अनाथ विद्यार्थी गृह येथे सेवाभाव या उद्देशाने नेहमी सामाजीक बांधिलकी जपत समजसेवा करणारे प्रदीप अण्णा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज अनाथ विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

हल्ली समाजात लोक केक,पार्ट्या करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करतात परंतु प्रदीप अण्णा यांनी सामाजीक बांधिलकी राखून संपूर्ण वेळ हा अनाथ मुलांसोबत घालउन अनाथ मुलांना आधार दिला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलले.प्रदीप अण्णा यांनी राजुरातील जनतेला अश्याच सेवाभाव पद्धतीने वाढदिवस साजरा करावा अशी कळकळीची विनंती केली.