एआयएमआयएमच्या शहराध्यक्षाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- एआयएमआयएम (AIMIM) पार्टीचे चंद्रपूर शहर अध्यक्ष अजहर शेख यांच्या विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात 10 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. आर्टस ट्रेडर्सचे संचालक वसीम अख्तर झीमरी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चंद्रपूर येथील जी.के.आर्टस ट्रेडर्सचे संचालक वसीम अख्तर झीमरी यांचा सुपारी व पान मटेरिअलचा व्यवसाय आहे. ९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी झीमरी यांचा वाहन चालक हेमंत निलेवार बल्लारपूर येथून परत येत असताना शहरातील जुनोना चौकात अमर कन्फेशनरी या दुकानात सुपारी देण्यासाठी थांबला होता. त्या ठिकाणी अजहर शेख आले. दमदाटी करून गाडीची झडती घेतली. त्यानंतर मालकाला तत्काळ फोन करून बोलविण्यास सांगितले. गाडी अडविल्याने झीमरी घटनास्थळी गेले असता अजहर शेख यांच्यासोबत भांडण झाला. त्यानंतर खंडणीच्या पैशांवरून दोघांमध्ये हाणामारी झाली. विशेष म्हणजे, अजहर शेखने ऑक्टोबर 2022 मध्ये 3 लाखाची खंडणी मागितली होती. त्यातील अडीच लाख रूपये छोटा बाजार चौकातील बंगलोर बेकरी जवळ दिल्याचे झिमरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर 28 ऑगस्ट 23 रोजी पुन्हा खंडणीची मागणी केली. तेव्हा रोख 50 हजार रूपये दिले. दरम्यान ऑक्टोबर 2022 पासून आजपर्यंत वेळोवेळी 3 लाख रूपये खंडणी दिल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केल्याने झीमरी यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर शहर पोलिसांनी अजहर शेख विरुध्द खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक चालुरकर करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)