पोंभूर्णा:- पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सामाजिक, राजकीय कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व आशिष कावटवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर घेऊन आपला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. या वेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले. युवासेना शहरप्रमुख महेश श्रिगिरीवार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र मरपल्लीवार,नगरसेवक बालाजी मेश्राम,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कोमल गरड,संचालक वासूदेव पाल,वसंत पोटे,भारती बदन,विनायक बुरांडे, सरपंच पवन गेडाम यांनी केले तर यशस्वी सहिल नैताम,नोकेश कपाट, अक्षय मंकिवार, आकाश गज्जलवार, गौरव गुरनुले, बजरंग बल्लावार, विशाल गुरुनुले, पंकज कोटरंगे, शिवाजी बावने, राकेश मोंगरकार, विकास गुरनुले ,सुरज कावडे, अंकुश गव्हारे , संदेश धोडरे, शैलेश वैरागडे, प्रकाश कानमपलिवार,सहकार्य केले.