चंद्रपूर जिल्ह्यात मृतावस्थेत नवजात अर्भक नालीत आढळले #chandrapur #chimur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडधा येथे मृतावस्थेत एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याचे आढळून आले. ही हृदयद्रावक घटना दि.१ नोव्हेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत एक नवजात अर्भक आढळून आले. स्त्री जातीचे २ ते ३ दिवसाचे हे अर्भक गावातील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात आज सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी साचलेल्या नालीत नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच भिशी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांची चम्मू घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृतावस्थेत होते. ती बालिका असून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुण्यातरी महिलेचे असावे, असा संशय आला होता, परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. कुणातरी बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रात्री नालीत आणून टाकले असावे, अशीही चर्चा आहे.