धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार #chandrapur #tiger #tigerattack


ब्रम्हपुरी:- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८मध्ये बुधवारी दुपारी ३:०० वाजता घडली. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शेतावर जाऊन धान कसे कापायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (६०) ही महिला बुधवारी सकाळी १०:०० वाजता धान कापायला गेली. दुपारी ३:०० च्या सुमारास शेतामध्ये असलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. डाेक्याचा भाग छिन्नविछिन्न करून या महिलेला शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये नेले. या महिलेच्या साेबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने वाघाने महिलेचा मृतदेह तिथेच ठेवून वाघ पळून गेला. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे, वनक्षेत्र सहायक ए. पी. करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले. तसेच मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत