वर्धा:- सुट्टीचा दिवस म्हणून मौज करण्यासाठी नदीवर गेलेल्या सुजल बाबाराव अवताडे (वय १६ , रा. कारला चौक) तसेच ओम अनिल धूर्वे (वय १७, रा.इंदिरानगर) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळची ही घटना आहे.
दोघेही वर्ध्याच्या नामांकित शाळेतील विद्यार्थी आहेत. हे दोघे व त्यांचा एक मित्र मिळून पंचधरा नदीच्या रायपूर परिसरात पोहचले. या ठिकाणी असलेल्या घोघरा धबधब्याचा उसळता प्रवाह त्यांना मोहात पाडणारा ठरला.
यापैकी एक पोहता पोहता पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला. तो पण गटांगळ्या खावू लागला. हे पाहून तिसऱ्या मित्राने काढता पाय घेत धूम ठोकली. या दुर्घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी हजर झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलेत.