शहरातील बुरुज क्र.१५ येथे सफाई दुत च्या हस्ते ध्वजारोहण

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- परिसरातील कचरा संकलन करून परिसर स्वच्छ ठेवणारी महिला स्वच्छता कर्मचारी सौ. राजेश्वरी मनोरंजन किल्लन या गेली अनेक वर्षे सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावत आहेत,त्यांचा कामाची दखल घेऊन चंद्रपुर शहरातील हनुमान खिडकी येथील बुरूज क्रमांक 15 वर परिसरातील सामाजिक कार्यात शहरात अग्रेसर असणारी हनुमान मंदिर समिती तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिन निमित्त सौ. राजेश्वरी मनोरंजन किल्लन यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
    आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे स्वच्छता कर्मचारी सोबत प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहेत,आणि या कर्तव्याची जान प्रत्येकाने स्वीकार करावे.असे आव्हाहन सौ. राजेश्वरी मनोरंजन किल्लन यांचा द्वारे या क्षणी करण्यात आले.
शिक्षिका वंदना अरुण चहारे आणि अंगणवाडी शिक्षिका सुरेखा अनमुलवार यांचा द्वारे सौ. राजेश्वरी मनोरंजन किल्लन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.या क्षणी भाजयूमो जिल्हा अध्यक्ष विशालभाऊ निंबाळकर यांचा सत्कार विजय भाऊ चहारे यांच्या हस्ते करण्यात आले.



    प्रत्येक व्यक्ती हा आपल्या परिसरातील दिन दुबळ्या तसेच गरजू सदस्यांचा अधिकार आणि सुरक्षितता याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच,असे युवा घडण ही काळाची गरज आहेत,बालगोपाल असे उज्वल भारत भविष्य घडवावे असे भाजयूमो जिल्हा अध्यक्ष विशालभाऊ निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.
   आजच्या आधुनिक युगात विविध माध्यमातून देश सेवा करण्याची संधी आजच्या क्षणी उपस्थित आहेत,फक्त दृढ इच्छेने प्रत्येक नागरिकांने समोर येणे महत्वाचे आहेत. असे मार्गदर्शन उपस्थितांना सामाजिक कार्य जोपासणारे आदरणिय मुग्धाताई खांडे यांचा द्वारे करण्यात आले. 
  परिसरातील बाल गोपालांनी उपस्थितांसमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त वेशभूषा भाषण सादर करून मन जिंकण्याचे कार्य केले. 
  या सोहळा क्षणी भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष राहुलभाऊ पाल,शिवसेना उपशहर प्रमुख राजू भाऊ आईटलावार,
अंगणवाडी शिक्षिका शोभा चहारे, अंगणवाडी शिक्षिका सुरेखा अनमुलवार आणि अंगणवाडी शिक्षिका रंजना रंगारी यांनी उपस्थिती दर्शविली.

देशाच्या समाज परिसर सेवा कार्या मध्ये व्यक्तिचे योगदान असे,सैनिक-शेतकरी,सफाई कर्मचारी अश्या व्यक्तिमत्त्व च्या हस्ते ध्वजारोहण चा मान नेहमी हनुमान मंदिर समिति तर्फे आयोजित करण्यात येत असे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)