उड़ान अकॅडमीचे संचालक इंजि. पिंपळशेंडे सर यांच्या हस्ते The Media 24 वेबसाईट व लोगोचे अनावरण #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- मुबारक शेख यांनी पत्रकारितेचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी The Media 24 ची नवीन वेबसाईटची निर्मिती केली. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून उड़ान अकॅडमीचे संचालक इंजि. पिंपळशेंडे सर यांच्या हस्ते The Media 24 वेबसाईट व लोगोचे अनावरण दि. 26 जानेवारी 2024 ला उड़ान अकॅडमीत करण्यात आले. 
New Website 


चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील मुबारक शेख यांनी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे पत्रकारितेचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून The Media 24 ची नवीन वेबसाईटची निर्मिती केली. या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम , बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहोचवण्याचा ठळक काम The Media 24 करणार आहे. दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी The Media 24 पुढाकार घेणार. या नवनिर्मितीत वेबसाईट व लोगोचे चे अनावरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)