गाव स्वच्छ, सुंदर बनवण्यास सेवा मंडळाची भुमिका महत्वाची -ॲड.राजेंद्र जेनेकर

Bhairav Diwase
0
गाव स्वच्छ, सुंदर बनवण्यास सेवा मंडळाची भुमिका महत्वाची -ॲड.राजेंद्र जेनेकर

नलफडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना.


राजुरा:-  तालुक्यातील नलफडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकरी मंडळीचे वतिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पुण्यस्मरण निमित्ताने नविन शाखा उदघाटन सोहळा प्रसंगी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन हनुमान मंदिरात करण्यात आले. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य श्रीगुरुदेव प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम तर प्रमुख अतिथी म्हणून शशांकजी धोटे,बळीराम बोबडे,बाबाराव धोटे,लटारु मत्ते उपाध्यक्ष, प्रभाकर बोबाटे मु.अ.,बाळा गोहोकर, शैलेश कावळे,गजानन बोबडे, मोहन वडस्कर, अनिल पिदूरकर,ज्ञानेश्वर मोरे,विनायक सोयाम, रामदास चौधरी,सौ.मिनाताई धोटे शाखाध्यक्ष,आनंदराव वडस्कर,रत्नाकर नक्कावार,मधुकर भगत आदींची उपस्थिती होती, सर्वधर्मीय अधिष्ठान,राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन  उदघाटन करण्यात आले, सामुदायिक प्रार्थनेचे महत्वावर लटारु मत्ते यांनी सखोल मार्गदर्शन केले,याप्रसंगी बाळा गोहोकर, प्रभाकर बोबाटे,शैलेश कावळे, रामदास चौधरी यांनी समयोचित विचार व्यक्त केले,कार्यक्रमाध्यक्ष ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी गाव स्वच्छ,सुंदर बनवण्यासाठी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची महत्वपूर्ण भुमिका असते,त्यामुळे सामाजिक सलोखा व स्वच्छता कायम राहू शकते असे विचार व्यक्त केले, याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नविन कार्यकारिणीला रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र देण्यात आले. सुत्रसंचलन सौ.शुभांगी धोटे यांनी तर खुशाल कोडापे यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता रमेश धानोरकर, कलावती बोबडे,रमेश पाकूलवार,अर्चना धानोरकर,अनुराधा धोटे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)