चंद्रपूर : नूतन वर्षाच्या पर्वावर ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूर ( Consumer Protection Committee, Chandrapur ) मार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा तक्रार निवारण विभाग, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व इत्यादी विभागाला दिनदर्शिका वितरित व ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूर पदाधिकाऱ्यांचे स्नेह मिलन
चंद्रपुर जिल्ह्यात ग्राहकांची होत असलेली लूट, व वाढती फसवणूक पाहता ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोष पारखी ( Santosh parkhi ), मा. श्री. विरेंद्र पुणेकर ( veerendra punekar ) जिल्हा उपाध्यक्ष, मा. श्री. संजय शिंदे जिल्हा उपाध्यक्ष, मुन्ना इलटम जिल्हा सचिव, दिपक नन्हेट जिल्हा संघटक, सदस्य मुक्कदरसिंग बावरे व सर्व ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूर पदाधिकारी, सदस्यांनी नूतन वर्षापासून होत असलेल्या फसगतीला कायमचा आळा घालण्याकरीता मूठ बांधली आहे. ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असून ग्राहकांच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यास सदैव तत्पर असणार आहे.
चंद्रपुर जिल्हा तक्रार निवारण विभागाच्या मा. श्रीमती. वैशाली रा. गावंडे ( Hon. Smt. Vaishali Res. Gawande ) यांच्याशी ग्राहकांना उद्धभवत असणाऱ्या समस्याचे निराकरण करण्याकरीता माहिती घेत कार्यालयात दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले व चंद्रपूर जिल्ह्यात ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती नेहमी ग्राहकांप्रती शासनाच्या असलेल्या सुविधा त्यांचे हक्क त्यांच्या पर्यंत पोचवण्याचे अविरत प्रयत्न करेल, तसेच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राहक हितार्थ उपक्रमात सहभागी असणार असे ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूरचे जिल्हाअध्यक्ष मा. श्री. संतोष पारखी, मा. जिल्हा उपाध्यक्ष श्री. विरेंद्र पुणेकर मा. जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय शिंदे ( Sanjay Shinde ), जिल्हा सचिव मुन्ना इलटम, जिल्हा संघटक दिपक नन्हेट, मुक्कदरसिंग बावरे दिपक नन्हेट जिल्हा संघटक, सदस्य मुक्कदरसिंग बावरे यांनी सांगितले तसेच सदर विभागा मार्फत ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समितीचे कौतुक करत शासन वेळोवेळी आपल्या समितीला सहकार्य करेल असे दिले आश्वासन. ( chandrapur ) ( mahawani ) ( grahak upbhoktta sanrakshan samiti, chandrapur )