Click Here...👇👇👇

नाव दुर्घटना, सहाव्या बेपत्ता महिलेचाही आढळला मृतदेह #chandrapur #gadchiroli #Chamorshi

Bhairav Diwase

चामोर्शी:- मिरची तोडणीच्या कामावर जाताना नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली होती. पाच जणींचे मृतदेह आढळले होते, तर एक बेपत्ता होती. घटनेनंतर चौथ्या दिवशी २६ जानेवारीला अखेर घटनेतील शेवटच्या बेपत्ता मायाबाई अशोक राऊत (४५) यांचा मृतदेह आढळून आला.

चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे वैनगंगा नदीपात्रात मजूर महिलांच्या दोन नावा बुडाल्याची घटना २३ जानेवारीला घडली होती. एका नावेतील आठजण सुखरूप वाचले, तर दुसऱ्या नावेतील गणपूर (रै.) गावच्या सहा महिलांना जलसमाधी मिळाली होती.

जिजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे (४२), रेवंता हरिश्चंद्र झाडे (४२), मायाबाई अशोक राऊत (४५), सुषमा सचिन राऊत (२२) या सासू-सुनेसह बुधाबाई देवाजी राऊत (६५) या सहा महिलांना जलसमाधी मिळाली. तर नावाडी सुरेंद्र शिंदे (३०, रा. टोक, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) व सरूबाई सुरेश कस्तुरे (५८, रा. गणपूर रै.) हे सुदैवाने वाचले.

२३ जानेवारी रोजी दोन, २४ जानेवारीला एक, २५ जानेवारी रोजी दोन मृतदेह आढळले होते तर मायाबाई अशोक राऊत यांचा शोध लागत नव्हता. प्रशासकीय यंत्रणा व बचाव पथक ठाण मांडून होते. अखेर २६ रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला.