कोंबडबाजारावर धाड; सात जणांना अटक, एक फरार #chandrapur #Nagbheed


नागभीड:- नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील शिवारात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर नागभीड पोलिसांनी रविवारी (दि. १८) सायंकाळी ५ वाजता धाड टाकून सात जणांना अटक केली. आरोपींकडून चार जिवंत कोंबडे व दुचाकीसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाहार्णी येथे शंकरपटाच्या दाणीलगत कोंबडबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून आरोपींकडून सात दुचाकी, रोख १ हजार ६६५ रुपये, चार कोंबडे आणि ४ कात्या असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून एक फरार आहे.

चंद्रशेखर जॉर्ज गेडाम (३६), सचिन अलोने (३५), नितीन अलोने (२७, रा. कुनघाडा चक), भाऊराव वलथरे (५२) तोरगाव, स्वप्निल कंगाले (२९), नीलेश मेश्राम (२७), शेखर टेकाम (२८, सर्व वेळवा, जि, भंडारा), प्रशांत किसन माटे (४२, रा. म्हसली, ता. नागभीड) अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने