घरगुती वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार
कोरपना:- मागील आठवडाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू आहे. ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर, चंद्रपुर नंतर कोरपना तालुक्यात घरगुती वादातून हत्या झाल्याची घटनेनं चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातील हि पाचवी हत्या आहे.
हेही वाचा:- चंद्रपूर जिल्ह्यात शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या
21 फेब्रुवारीला कोरपना तालुक्यातील लोणी गावातील मुलाने घरगुती वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात आई कमलाबाई पांडुरंग सातपुते या जागीच ठार झाल्या असुन वडील पांडुरंग सातपुते हे गंभीर जखमी झाले आहेत. वडील पांडुरंग सातपुते ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे प्राथमिक उपचार दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे रेफर केले.
हेही वाचा:- चंद्रपूर जिल्ह्यात पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी मुलगा मनोज सातपुते याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. कोरपना पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे
हेही वाचा:- बॉयफ्रेंडच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तरुणीचा मृतदेह; तर प्रियकर....
मित्रांसोबतची दारूची पार्टी ठरली अखेरची!