सावली:- सावली येथून जवळच असलेल्या चकपिरंजी येथील तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या मालकाचा बैलासह बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. ११ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. शरद वाठोबा वाडगुरे (५४, रा. चकपिरंजी) असे मृतकाचे नाव आहे.
शरद वाडगुरे हे रविवारी सायंकाळी बैल धुण्यासाठी गावालगतच असलेल्या तलावावर गेले होते. बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात शिरला. मात्र, त्या ठिकाणी चिखल असल्याने एक बैल व स्वतः मृतक शरद त्या चिखलात फसले. बाहेर निघता न आल्याने त्यांचा करूण अंत झाला.