इंस्टाग्रामवर मैत्री; लॉजवर नेऊन मुलीवर अत्याचार #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- इन्स्टाग्रामवरून मैत्री झालेल्या एका युवकाने अल्पवयीन मैत्रिणीवर अतिप्रसंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. शुभम मोहुर्ले (रा. ओवाळा) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पीडित अल्पवयीन आरोपी शुभम मोहुर्ले तरुणीची याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीतून त्याने मैत्री तयार केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान, गुरुवारी (दि. २२) सिंदेवाही येथील लॉजवर नेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला. तक्रारीवरून तळोधी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३६३, ३६६ ए, ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६, सहकलम ४, ६ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)