Top News

अखेर मृत्यूशी झुंज संपली #chandrapur #Korpana #murder


मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू

कोरपना:- आई- वडिलांना घरात डांबून ठेवून मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वडीलांची मृत्यूशी झुंज सुरू होती.


अखेर गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना कोरपना तालुक्यातील लोनी गावात बुधवारी (दि.२१) दुपारी घडली होती. कमला पांडुरंग सातपुते व पांडुरंग सातपुते असे या मृत आई -वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा मनोज पांडुरंग सातपुते ( ४५) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोरपना तालुक्यातील लोणी गावातील मनोज सातपुते या पोटच्या मुलाने बुधवारी (दि.२१) दुपारी घरातील एका खोलीत आई- वडिलांना कोंडून घेतले. व त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या आरोपीच्या वडिलांना चंद्रपूरातील कोल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. व आईचा मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीला पाठविला. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपीच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक होती. दोन दिवसाच्या उपचारानंतर गुरूवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा मनोज पांडुरंग सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने