Top News

'गरुडझेप' अकॅडमी की छळछावणी? #Chandrapur #chatrapatiSambhajinagar


प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, Video व्हायरल



छत्रपती संभाजीनगर:- (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील बजाजनगरमध्ये असलेली गरुड झेप अकॅडमी (Garud Zep Academy) आता चांगलीच चर्चेत आली आहे.


व्हायरल व्हिडिओ 

👇👇👇👇

https://www.instagram.com/adharnews04?igsh=MWl3azhqM3h3Mjdo

आजच आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा ..


डिसेंबर महिन्यात एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर 2 दिवसापूर्वीच एका मुलीने देखील आत्महत्या केली. त्यानंतर या अकॅडमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.



'गरुडझेप' अकॅडमी की छळछावणी असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे. अकॅडमीतील कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचं समोर आलं (Garud Zep Academy Student Harassment) आहे.


या घटनेमुळे आता अकॅडमीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे पालक वर्ग संताप व्यक्त करत आहेत. यावर कारवाईची मागणी केली जात (Student Harassment Video Viral) आहे. दरम्यान या अकॅडमीमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींचा प्रचंड छळ सुरू आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली बेदम मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.



तरूण-तरूणी आपली स्वप्न घेऊन अकॅडमीमध्ये प्रवेश (Garud Zep Academy Viral Video) घेतात. पालक पैसे भरून आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतात. त्यांना या अकॅडमीमध्ये अशी भयंकर वागणूक मिळत आहे. गरुड झेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.



यापूर्वी याच अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी घडली होती. लिना श्रीराम पाटील, असं मृत तरुणीचं नाव (Sambhajinagar Crime News) आहे. अकॅडमीत होणाऱ्या छळाला कंटाळून तिने असा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. अकॅडमीत तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. छळाला कंटाळून तिने गळफास घेतला होता.



लिनाला खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर तिला साधा नाश्ताही दिला जात ( Crime News) नव्हता. इतर प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक मिळत होती. 'तू काळी आहेस, असं हिणवले जात होती. या सगळ्या प्रकारामुळे लीना तणावात गेली होती, अशी माहिती मिळतेय.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने