Top News

रेती तस्करी जोरात अधिकारी मात्र कोमात!


कोरपना:- कोरपना तालुक्यातील इरई-भोयगाव नदीपात्रातून भरदिवसा व विशेषतः रात्रीच्या सुमारास परिसरातील रेती तस्कर लाखों रूपयांची रेती चोरून नदीपात्रालाच भगदाड पाडत असल्याचे चित्र आहे.या रेती तस्करांचे मुसके आवळण्याची गरज असताना महसूल विभाग,स्थानिक पोलीस प्रशासनाने कमालीची डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.या विभागातील काहींसोबत रेती तस्करांनी मैत्रीपुर्ण संंबंध प्रस्थापित करून मोकळे रान उपलब्ध करून घेरल्याचे खळबळजनक आरोप नागरिकांकडून होत आहे.

वास्तविक पाहता गेल्या जवळपास सहा महिन्यापासून विविध माध्यमातून सदर ठिकाणी होत असलेल्या रेती उत्खनन व तस्करीवर प्रकाश टाकण्यात येत आहे.मात्र,आजपर्यंत कोणीही कारवाई करण्याचे सौजन्य दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्ह्यात विवध ठिकाणी कारवाईची मालिका सुरू असतानाच येथे कारवाई शून्य का? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.''अखेर कुणीच कारवाई का करत नाही?'' असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले असून याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.

कोरपना तालुका हा औद्योगिक दृष्ट्या प्रगत आहे.तालुक्यातील गाव,शहरात नाना प्रकारे बांधकाम सुरू आहे.यामुळे रेतीची मागणी वाढली आहे.माहितीनूसार सध्या तरी तालुक्यात रेती घाट सुरू नसल्यामुळे अवैध रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत.उदाहरणार्थ इरई-भोयगाव नदी पात्राची दोन महिन्यापूर्वी जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा,त्याठिकाणी रेतीचे अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे दिसून आले.रेती तस्करांनी रेतीचे वाहन ने-आन करण्यासाठी रस्ता बनवला होता.सदर बाब लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित विभागाने त्याठिकाणी खड्डा खोदून रस्ता बंद केला.मात्र,काही दिवसानंतर पुन्हा खड्डा बुजवून पुन्हा बेधडक रेती तस्करी सुरू असल्याची माहिती आहे.येथे रेतीचे उत्खनन करून ट्रक्टरद्वारे वाहतूक करणे,गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिक उघड्या डोळ्यांनी दररोज पाहतात मात्र,संबंधीत पोलीस विभाग,मंडळाधिकारी,तलाठी,सरपंच,पोलीस पाटील,यांना हे चित्र दिसत नसेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणात कौतुकास्पद तपास करून कारवाई करणारी स्थानिक गुन्हे शाखा सुद्धा,इतरांच्या पाठोपाठ या तस्करांचे मुसके आवळण्यात फेल ठरत असल्याचे संतप्त आरोप सुज्ज्ञ नागरिक करताना दिसत आहेत.!  

अल्पशा काळात मोठी करवाई रणजित यादव तत्कालीन तहसीलदार यांची
  
     काही दिवसापूर्वी कोरपना तहसीलचे कारभार रणजित यादव सांभाळणारे तत्कालीन तहसीलदाराने आपल्या अल्पशा काळात हायवा, ट्रक्टरवर धडाकेबाज कारवाई केली होती,अवैध गौण खनिज उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.मात्र ते गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैथेच बनली आहे.गडचांदूर पोलीस,स्थानिक पटवारी,मंडल अधिकारी,या तस्करांवर कारवाई करतील ? अशी अपेक्षा करणे चुकीचे असून कोरपनाचे तहसीलदार आणि नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे जातीने लक्ष देऊन याठिकाणी सुरू असलेल्या रेती तस्करीवर कायमचे अंकुश लावण्याची विनंती वजा मागणी नागरिकांनी या माध्यमातून केली आहे.आता यासंदर्भात काही सकारात्मक घडते का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने