गावठी पिस्तूलसह पाच जिवंत काडतुसे जप्त; एकाला अटक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहरात गावठी पिस्तूलसह फिरणाऱ्या एका आरोपीला आज (दि.२५) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. नागे जुबेर साहेबअली शेख (वय २०, रा. लालपेठ कॉलरी चंद्रपुर) असे त्याचे नाव आहे.

जिल्हयात अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार केले. याप्रकरणी शोधमोहिम सुरू असताना चंद्रपुर येथील एका पान सेंटरजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे गावठी पिस्तूलसह पाच जिवंत काडतुसे मिळून आली. सखोल चौकशीदरम्यान त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार यांनी कारवाई केली.