Top News

इवलीशी दिसते पण निसर्गाचा आदर्श मनात ठेवते मोठा#chandrapur

चंद्रपूर:- ताडोबा मध्ये देश-विदेश मधून कित्येक पर्यटन भेटी देत असतात. ते फक्त वाघ बघण्याच्या उद्देशाने पण आता वाघाप्रमाणे बर्ड मॅन सुमेध वाघमारे यांनाही बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.


बर्डमॅन सुमेध वाघमारे निसर्ग संवर्धनासाठी आपल्या वन्यपक्षांचे व प्राण्यांच्या आवाजाच्या कलेमधून मोठ्या प्रमाणात निसर्ग संवर्धन करत असतात. अशा नियमित होत असलेल्या कार्यक्रमामधून खूप लोकांमध्ये निसर्गाप्रती आदर प्रेम आणि जागृती निर्माण झाली आहे.

यातीलच एक ८ वर्षाची चिमुकली गार्गी विनोद देवालकर तीने सांगितले की, मी कार्यक्रम जेव्हापासून बघितला तेव्हापासून झाडापासून निर्माण होणाऱ्या टिशू पेपरचा वापर मी ही करत नाही व घरातील इतरांनाही करू देत नाही. तिच्या वडिलांनी सांगितले की, कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं की गार्गी सांगते त्या काकांनी सांगितलं की टिशू पेपर हे झाडांपासून बनतात जर आपण टिश्यू-पेपर नाही वापरले तर मोठ्या प्रमाणात झाडे वाचवता येतील.

आणि मजेशीर म्हणजे पक्षांच्या प्राण्यांच्या आवाजाची मज्जाही ती घेत असते. अशा पद्धतीने जर निसर्ग जनजागृती होत असेल तर नक्कीच येणारी तरुण पिढी ही वृक्ष, प्राणी व पक्षी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात स्वतःहून उतरतील. या निस्वार्थी इवल्याशा मनात निसर्ग संवर्धनाची कळी बर्डमॅन सुमेध वाघमारे खुलवतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने