शेतीच्या फेरफारसाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या महिला तलाठीला अटक #chandrapur #acbchandrapur #arrest

चंद्रपूर:- शेत जमिनीचे फेरफार करण्यासाठी चार हजाराची लाच घेणाऱ्या एका महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चंद्रपूर तालुक्यातीत नागाळा येथील तलाठी प्रणाली अनिलकुमार गुडुरवार असे आरोपी तलाठीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चंद्रपूर तालुक्यातील मौजा सिदुर येथील रहीवासी असून शेतकरी आहे. तक्रारदाराच्या वडीलांनी त्यांचे नावे असलेली सिदुर, (ता. जि. चंद्रपूर) येथील शेतजमीन तक्रारदार व तक्रारदाराच्या पत्नी, मुलाचे नावे बक्षिसपत्र करून दिले होते. सदर बक्षिसपत्र करून दिलेली शेतीचे फेरफार करण्याचे कामाकरीता तक्रारदार नागाळा येथील तलाठी कार्यालयात जावून तलाठी प्रणाली अनिलकुमार गुंडरवार यांचेकडे अर्ज केला होता.


तक्रारदार हे काही दिवसानंतर सदर अर्जाची चौकशी करण्याकरीता नागाळा तलाठी कायर्यालयात गेले असता महिला तलाठीने फेरफार करून सातबारा उतारे तयार करून देण्याचे कामाकरीता पाच हजाराची लाचेच्या रूपात मागणी केली होती. तक्रारदार यांना, तलाठी यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे जावून तक्रार दाखविली होती.

गुरूवारी पोलीस निरोधक प्रशांत पाटील यांनी, तक्रारदारानरे केलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून करून कारवाई करण्यासाठी सापळा रचला. तक्रार पडताळणी दरम्यान तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार गुडुरवार यांनी शेतीचे फेरफार करून सातबारा उतारे तयार करून देण्याचे कामाकरीता 5 हजाराची मागणी केली होती. त्यापैकी तडजोडीअंती 4 हजार देण्याचे ठरले. आज गुरूवारी महिला तलाठी यांना 4 हजाराची लाच स्विकारताना तलाठी कार्यालय साजा क. ४ नागाळा, ता. जि. चंद्रपूर येथे सापळ रचून तलाठीला रंगेहाथ लाख घेताना अटक करण्यात आली.

लाच लुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक, पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा, हिवराज नेवारे, नापोशि रोशन चांदेकर, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, म.पो.अ. पुष्पा काचोळे यांनी कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने