मुरमुऱ्याच्या पोत्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधीत मद्यसाठा नेताना जप्त #chandrapur #Lcbchandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभुमीवर मुरमुऱ्याच्या पोत्यातून गडचिरोली जिल्ह्यात तस्करी करताना स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित मद्यसाठा जप्त मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई गुरूवारी (7 मार्च 24) ला करण्यात आली.

आज (दि. ७) सकाळी दहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास एका बोलेरो पिकअप वाहन मध्यप्रदेशातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतुक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचला. चंद्रपुर मार्गाने येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ या वाहनास ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली. त्या मध्ये गोवा ब्रॅन्ड दारूनी भरलेल्या १८० एम एल च्या ३९ पेट्या किंमत एकुण २ लाख 14 हजार पाचशे रूपये, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ किंमत 8 लाख रूपये, दोन नग मोवाईल किंमत १० हजार रूपये असा एकूण १० लाख २४ हजार ५०० रूपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बल्लारपूर पोलिस ठाण्यात आरोपी फारूख शेख मुमताज शेख (वय २१) रा. नुरानी नगर, नागपूर, तुषार संतोष नेहारे (वय २३) रा. चिचभवन यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे सपोनि. ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, पोकॉ. गोपाल आतकुलवार, पोकॉ. नितीन रायपुरे, सायबर गुन्हे शाखेचे पोकॉ. राहुल पोंदे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.