कॉंगेसमध्ये चंद्रपूर लोकसभेचा पेच अद्यापही कायमच! #Chandrapur #chandrapurloksabha


चंद्रपूर:- कॉंगेसमध्ये चंद्रपूर लोकसभेचा पेच अद्यापही कायमच आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभा लढवण्यास फारसे इच्छुक दिसत नाही. पण विजय वडेट्टीवार यांना हायकमांडने आदेश दिल्यास ते चंद्रपूर लोकसभा लढू शकतात. मात्र वडेट्टीवार हे आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही आहे. सध्या विजय वडेट्टीवर आणि शिवानी वडेट्टीवार दिल्लीमध्ये तड ठोकून आहे. दरम्यान लवकरच काँग्रेस चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवर निर्णय घेणार असल्यास कळत आहे. तर आमदार प्रतिभा धानोरकर या देखील महाविकास आघाडीतील नेते शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहे.



चंद्रपूर लोकसभेत एकीकडे भाजपचा उमेदवार प्रचाराला लागला तर दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. हायकमांडणे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवडणूक लढवण्यास सांगितले आहे, परंतु वडेट्टीवार हे मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही आहे. शिवानी वडेट्टीवार गेले सहा ते सात वर्ष त्या मतदार संघामध्ये गाव-गावात फिरत आहे, म्हणून तिचा अधिकार पहिला असे वडेट्टीवार म्हणतात आणि त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचा हा हायकमांडणे आग्रह आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेते आणि ओबीसी नेता म्हणून इतर मतदारसंघात मी प्रचाराला मोकळा राहील अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी हायकमांड कडे मांडली आहे



आमदार प्रतिभा धानोरकर यांचा आग्रह आहे की, चंद्रपूरची लोकसभा ती त्यांना मिळावी त्यांनी हायकमांडची सुद्धा भेट घेतली आणि आता शरद पवारांची भेटीला गेले आहेत. शरद पवारांनी जसे बाळू धानोरकरांच्या उमेदवारीसाठी शरद पवारांनी प्रयत्न केले होते त्याच प्रकारे आताही प्रयत्न करावे अशी त्यांची इच्छा आहे, परंतु हायकमांड काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या