Top News

काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या "राजकारणात तरुणांना ....." #Chandrapur #Shivaniwadettiwar


चंद्रपूर:- केंद्रातील विद्यमान सरकारचे खासगीकरणाचे धोरण आणि वाढती बेरोजगारी यामुळे युवकांसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यांचा आवाज संसेदत उचलण्यासाठी काँग्रेसने तरुण रक्ताला संधी द्यावी, असे मत प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.


यावेळी त्यांनी त्यांचे युवक काँग्रेसमधील कार्य आणि कंत्राटी कामगारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले कार्य, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून होणारा त्रास, खासगी कंपन्यांनी स्थानिक युवकांना रोजगारपासून दूर ठेवणे आदी मुद्यांवर आपले मत मांडले.


त्या म्हणाल्या, २०१७ पासून युवक काँग्रेसमध्ये काम करीत आहे. या माध्यमातून तरुणांच्या प्रश्नांवर आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. येथे सिमेंट, कोळसा, ऊर्जा क्षेत्रातील अनेक उद्योग आहेत. परंतु स्थानिक युवकांना रोजगार देण्यास खासगी कंपन्या टाळाटाळ करतात.


 औद्योगिक जिल्हा असूनही येथील युवकांसमोर सर्वांत मोठा प्रश्न बरोजगारीचा आहे. विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून अनेक आंदोलन केली. अलीकडेच कंत्राटी कामगारांच्या वाढीव वेतनाच्या मुद्यांवरून संप पुरकारला. हा संप तीन दिवस सुरू होता. अखेर हा प्रश्न मार्गी लागला. येत्या १ एप्रिलपासून थकीत वेतनासह वाढीव वेतन मिळणार आहे. यापूर्वी २०२० ला अल्ट्रा टेकमधील कामगारांसाठी आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना फार त्रास आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या मुद्यांकडे प्रामुख्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. पण, वनमंत्री ताडोबा महोत्सव साजरा करून पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा आरोपही शिवानी यांनी केला.

शेतकऱ्यांना हमीभाव का नाही? पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास आपण येथील लोकांचे प्रश्न संसदेत लावून धरू. जिल्ह्यातील रोजगारात स्थानिकांना ८० टक्के संधी मिळावी, यासाठी आग्रह करू. चंद्रपुरात प्रदूषण खूप आहे. ही ओळख पुसून टाकण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येतील. शेतकरी आत्महत्येसाठी यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. केंद्र सरकार शेतकऱ्यांना हमीभाव का देत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने