Top News

सायकल व दुचाकींच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोन जण गंभीर जखमी #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथून सायंकाळी ५:३० वाजता कामकाज आटपवून दुचाकीने सातारातुकुम निघालेल्या दुचाकी व सायकलच्या धडकेत एक मृत झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना ५ मार्च मंगळवारला रात्रौ सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास चेक हत्तीबोडी रोडवर घडली. मृतकाचे नाव दसरत जनार्धन सोनटक्के रा.सातारा तुकुम (३२) जखमींत निखिल आलम रा. सातारा तूकुम (२९) सायकलचालक जखमी रविंद्र धोंडुजी बुरांडे रा.चेक हत्तीबोडी (६५) असे आहे.


मंगळवारला कामकाज आटोपून दसरथ सोनटक्के व निखिल आलम हे सायंकाळी पोंभुर्ण्या वरून सातारा तुकुम आपल्या गावाकडे जात होते. सायकलस्वार रविंद्र बुरांडे हे त्यांच्या शेतामधून गोबीचे कॅरेट सायकलवर मांडून ढकलत चेक हत्तीबोडी गावाकडे जात असता मागुन येणाऱ्या दुचाकी टीव्हीएस स्टार सिटी क्र.एमएच ३४ डब्लु ८४२४ ने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दसरथ सोनटक्के याचा मृत्यू झाला तर मागे बसणारा निखिल आणि सायकलस्वार रविंद्र हे जखमी झाले असून मृतकच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, आणि एक मुलगा आहे.


जखमींना तात्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर उपचार सुरू आहे.अपघाताचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने