तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसात रेती उपसा पूर्णपणे बंद आहे. असे असूनही पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा शिवारातील जंगलालगत असलेल्या वनविभागाच्या नाल्याच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळताच मंगळवार दि. ५ मार्चला सकाळी ९ वाजताच्या सुमारास रोशन वासुदेव ठेंगणे यांच्या मालकीची अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ एबी २३१५ व ट्राली क्र. एमएच ३४ एपी ३४०३ पकडुन तहसीलदार शिवाजी कदम यांनी तहसील कार्यालयात जमा केले.महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)व (८)अन्वये दंडात्मक कारवाई कारवाई करण्यात आली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.
उमरी पोतदार येथेही दि.१ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास अवैध रेती तस्करी करताना एमएच ३४ बिएफ- ५१७५ व एमएच ३४-७८७५ दोन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले होते.त्यांचेवरही महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.