चंद्रपूर लोकसभा उमेदवारीसाठी वडेट्टीवार विरूध्द धानोरकर! #Chandrapur #chandrapurloksabha #wadettiwarvsDhanorkar

Bhairav Diwase

शिवानी वडेट्टीवार समर्थकांसह दिल्लीला हायकमांडची भेट घेणार
 
चंद्रपूर:- सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात बाहेरच्या लोकसभा मतदार संघातील नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र बाहेरचा उमेदवार लादू नये, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातीलच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेत स्थानिक उमेदवारच दिला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.


संभाव्य घडामोडी बघता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवानी वडेट्टीवार यांनी समर्थकांसह दिल्लीला हायकमांडची भेट घेणार आहे.

लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांचं नाव निश्चित असतांना अचानक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी जर-तर चा आधार घेत लोकसभेसाठी आपली दावेदारी केल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल वाढली आहे


काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने लोकसभेची उमेदवारी आता दिल्लीतून नाही तर मुंबईतूनच ठरणार असल्याचे बोले जात आहे. दरम्यान, मुंबईतील बैठकीनंतर वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर या १२ मार्च रोजी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. एकूणच वडेट्टीवार विरूध्द धानोरकर यांचा वाद विकोपाला गेला असून लोकसभा उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे.