Top News

चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये चढाओढ? #PratibhaDhanorkar #chandrapur #chandrapurloksabha


आ. प्रतिभा धानोरकरांकडून दावेदारीचा पुनरुच्चार

चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभेसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या दावेदारी नंतर आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी पुन्हा एकदा मीच लोकसभेची दावेदार असल्याचा पुनरुच्चार केलाय.

सोबतच त्यांनी 2019 च्या लोकसभेमध्ये वडेट्टीवार यांनी तिकीट नाकारल्याची आठवण करून दिली आहे. एखाद्या दिवंगत लोकप्रतिनिधीच्या परिवारातल्याचं सदस्याला उमेदवारी देण्याची काँग्रेसची (Congress) परंपरा असल्याचा दाखला देत, मीच लोकसभेसाठी नैसर्गिक दावेदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्य म्हणजे जनसमुदाय, कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या सोबत आहे, त्यामुळे कोणीही दावा केला तरी त्याचा परिणाम माझ्या तिकीटावर अजिबात होणार नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं आहे. सोबतच पक्षाने तिकीट दिली नाही तरी आपण भाजपात जाणार नाही, हे ही त्या सांगायला विसरल्या नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असे देखील धानोरकर या पूर्वी म्हणाल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेसाठी आपलीच दावेदारी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने