फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत आज मुनगंटीवार भरणार उमेदवारी अर्ज! #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार हे २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नामांकन भरणार आहेत.


माझी उमेदवारी हे कोणत्याही उमेदवाराच्या विरुद्ध नसून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पराजय करण्यासाठी नाही; या लोकसभेच्या विकासाचा विजय व्हावा विकासाची गती वाढावी, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.



नामांकन भरताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या वतीने राजेंद्र जैन, शिवसेनेच्या वतीने नागपूर विभागाचे प्रमुख किरण पांडव व आरपीआय आठवले गट आरपीआय जोगेंद्र कवाडे यांचे सर्व मित्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आवेदन अर्ज दाखल करण्यासाठी आशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी राहणार आहे.