...तर चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 200 बिअर बार बंद होतील:- मनोज पाल #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- दारूबंदी हटविल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ४०० नव्या बिअर बारला परवानगी देण्यात आली असा गंभीर आरोप चंद्रपूर येथील भाजप नेते मनोज पाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

चंद्रपूर जिल्ह्यात बिअर बारला परवानगी देताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. हे सर्व कारस्थान लाचलुचपत विभागाने केलेल्या कार्यवाहीत सापडलेले व निलंबीत झालेले चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात झाले असा गंभीर आरोप भाजप नेते मनोज पाल यांनी काल (सोमवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

वर्ष 2015 मध्ये चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. दारूबंदी नंतर 7 वर्षांनी महाविकास आघाडी सरकारने हटविली. त्यावेळी जिल्ह्यात एकूण 350 बिअर बार होते. त्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पध्दतीने 400 बिअर बार ची परवानगी देण्यात आली. यामध्ये अनेक बिअरबार धारकांकडे नियमानुसार कागदपत्रे नाहीत. संजय पाटील यांनी अर्थकारण करीत नियमांना धाब्यावर बसविले व नव्या बारला परवानगी देण्यात आली, असा गंभीर आरोप पाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील व इतर दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. भाजप नेते मनोज पाल यांनी जिल्ह्यातील सर्व बार, देशी भट्टी व वाइन शॉप बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असून, त्यांनतर नियमबाह्य दारू दुकानांबाबत मी स्वतः प्रशासनाकडे तक्रार करणारअसल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली तर चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 200 बिअर बार नक्कीच बंद होणार, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपच्या डॉ.भारती दुधानी, उज्वला नलगे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)