चंद्रपूर:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंदेवाही शहरातील शाखेच्या इमारतीला आग लागल्याचे निर्दशनात येताच खळबळ उडाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे म्हटले जात आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे व अग्निशामक दलाच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविवण्यास यश आले.
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंदेवाही शहरातील शाखेच्या इमारतीला आग लागली या घटनेची माहिती सिंदेवाही पोलीस विभागाला व अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यास यश आले, या आगीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अनेक वस्तू जळून खाक झाले आहे. घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस करत आहे.