वरोरा:- वरोरा सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असून त्यावर सट्टा लावल्या जाते. वरोरा शहरात सट्टा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी धाडटाकली यामध्ये सट्ट्याचे साहित्य व एका व्यक्तीस ताब्यात घेतले तर अनेकावर गुन्हे दाखल करण्यात आले.
आय.पी.एल. मॅचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणारे आरोपी विरूध्द कारवाई करणेकरीता, सहायक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटमयांनी, गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुघाने यांचे घरी, बावने ले आउट, साई मंगल कार्यालयाच्या बाजुला, वरोरा येथे आय.पी.एल. वर सटटा खेळणारे आरोपीवर धाड टाकलीअसता, एक खोली मध्ये ओमप्रकाश देविदास जाधव, आशिष गजानन जाधव, रा. वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहाने, चिन्नस्वामी स्टेडीयम, बेंगलोर येथील ग्राउंडवर, चालु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या आय.पी.एल.लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हारजितचा जुगार खेळ खेळीत सटट्टा लावतांनाअसतांना मिळुन आले.
घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक अक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२ हजार ७४० रू. असा एकुन ०२ लाख ६७ हजार ४१० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व आरोपी नामे ओमप्रकाश देविदास जाधव (४३), आशिष गजानन जाधव, (२७) दोन्ही रा. सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, आरोपी मिनाज शेख रा. वणी जि. यवतमाळ जम्मु शेख रा. वणी जि. यवतमाळ रितीक जाधव रा. वरोरा. अमोल डांगरे रा. वरोरा अमोल टिपले रा. वरोरा बादल लाखा रा. वरोरा भुषण दिक्षीत रा. वरोरा डॉ. काळे रा. वरोरा, अजिंक्य नरडे रा. वरोरा, अमित घोडमारे रा. वरोरा समीर पाटील रा. वरोरा सुरज रा. बुटट्टीबोरी नागपुर. राजेश तुपकर रा. वरोरा रवि गभणे रा. वरोरा राहुल टिपले रा. वरोरा पिंन्दु तडस रा. वरोरा पिंन्दु टोंगे रा. वरोरा प्रसाद खडसान रा. वरोरा कुणाल चिमुरकर रा. वरोरा मोहीत शर्मा रा. वरोरा अनिल पाटील रा. वरोरा पंकज वैद्य रा. वरोरा अमित भगत रा. वरोरा गौरव रा. वरोरा रणजित रा. वरोरा अतुल वानखेडे रा. वरोरा मंगेश रा. भद्रावती मंगेश रा. वरोरा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा करीत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, सपोनि विनोद जांभळे, पो.अं. दिपक दुधे, दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली आहे.