छत्रपती संभाजीनगर:- जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे किरकोळ वादातून एका टपरी चालकाचा दाेघा भावांनी खून केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाेलिसांनी दोन्ही भावांना ताब्यात घेतले. दरम्यान रांजणगाव शेणपुंजी येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाेलिसांना घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार सुनील राठोड या टपरीधारकाचे किरकाेळ कारणावरुन दाेघांशी वाद झाला. या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यात दाेघांनी मिळून राठाेड याच्यावप चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली.
या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या भागात पोलिस चौकी सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पाेलिस दलास केली आहे.


