मला तिकिट मिळू नये, त्यासाठी आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली:- प्रतिभा धानोरकर #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी काळात राज्यात सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या. आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली, पैशाचे आमिष दाखविल्याचा केला धक्कादायक आरोप यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी केला.


चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा क्षेत्रात सध्या धन्यवाद सभा आयोजित केल्या जात आहेत.


 बुधवारी संध्याकाळी राजुरा शहरात रॅलीनंतर आयोजित केलेल्या धन्यवाद सभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी काळात राज्यात सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ब्रम्हपुरी मतदारांचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा रोख वडेट्टीवार यांच्याकडेच होता, अशी चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)