Click Here...👇👇👇

चंद्रपूर पोलिस भरतीतील गैरहजर पुरुष व महिला उमेदवारांना पुन्हा एक संधी! #Chandrapur #Chandrapurpolice

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर पोलिस दलातील 137 पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणी परीक्षेस गैरहजर राहिलेल्या पुरुष व महिला उमेदवारांसाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा उमेदवारांनी शुक्रवारी दिनांक 12 जुलैला सकाळी 5 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Also Read:- चंद्रपूर जिल्हा बनतोय "हत्या"पूर 

चंद्रपूर पोलिस दलातील 137 पोलीस शिपाई व 09 बॅण्डस्मनची रिक्त भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार भरतीसाठी एकूण 22 हजार 583 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी दि. 19 जूनपासून उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. काही उमेदवार मैदानी चाचणीस गैरहजर राहिले. त्यामुळे अशा उमेदवारांना चंद्रपूर पोलिसांनी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी दिनांक 12 जुलैला सकाळी 5:00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Also Read:- जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2023-2024 उमेदवारांकरीता महत्वाची सुचना


दिनांक 12/07/2024 रोजी पोलीस शिपाई (पुरुष) व (महिला) पदासाठी शेवटची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. तरी, ज्या महिला व पुरुष उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीचे आवेदन करुन मैदानी चाचणी केली नसेल, किंवा पुढील तारीख वाढवुन घेतली नसेल त्यांना शेवटची संधी म्हणुन अशा उमदेवारांनी दिनांक 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 5:00 वाजता मैदानी चाचणी करीता जिल्हा क्रिडा संकुल चंद्रपूर येथे उपस्थित राहावे. यानंतर संधी देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.