चंद्रपूर जिल्हा बनतोय "हत्या"पूर #chandrapur #murder #police #chandrapurmurder


चंद्रपूर:- गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात सतत हत्येच्या घटना घडत असून, आतापर्यंत नागभीड, बल्लारपूर, चंद्रपूर , ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर, चंद्रपुर, कोरपना या ठिकाणी हत्येच्या घटना घडल्या आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात 8 हत्या झाल्याच्या घटनेनं अख्य चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.

क्षुल्लक वादातून एका 17 वर्षीय मुलाने जन्मदात्याची हत्या केली. ही घटना नागभीड तालुक्यातील वासाळा (मेंढा) येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. दामोधर केशव गावतुरे (50)असे मृतकाचे, तर प्रफुल्ल गावतुरे आरोपीचे नाव आहे. मृतकाला दारूचे व्यसन होते. तो नेहमीच मद्यधुंद अवस्थेत राहायचा. घटनेच्या दिवशी मृतकाची पत्नी व आरोपीची आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. दरम्यान, वडिल व मुलामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. वडिलाच्या डोक्यावर काठीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

बल्लारपूर शहर लगत असलेल्या विसापूर गावात एका 38 वर्षीय व्यक्तीची अज्ञाताकडून हत्या झाल्याची घटना 23 जानेवारीला घडली. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहिती नुसार विसापूर गावातील वॉर्ड नं 1 मधील असलेले सचिन वांगणे वय 38 वर्ष यांची अज्ञात व्यक्ती नी मध्यरात्री च्या सुमारास हत्या झाल्याची घटना घडली. आरोपीबाबत गोपनीय माहिती काढुन 24 तासाचे आंत आरोपी यास निष्पन्न करून आरोपी नामे विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे वय 37 वर्ष रा. वार्ड क्र 01, विसापुर ता. बल्लारपूर यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील युवासेनेचे शहराध्यक्ष शिवा मिलींद वझरकर यांची हत्या झाल्याची घटना घडली. चंद्रपूर शहर युवासेना शहराध्यक्ष शिवा मिलींद वझरकर यांची धारधार शस्त्राने 25 जानेवारीला रात्री 9 वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला झाली. स्वप्नील चंद्रकांत काशीकर (३८), रिझवान अजहर पठाण (३०), नाजीर रफिक शेख (२१), हिमांशू देवानंद कुमरे (२३), सुमीत संतोष दाते (२६), रोहित कृष्ण पितरकर (२३), चैतन्य उर्फ लाला सुनील ऑस्कर (१८), अन्सार अलिमखान पठाण (२४) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दि. 12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली. हिरकण्या जयदेव पिल्लेवान असे मृतक महिलेचे नाव आहे. 12 फेब्रुवारीला सकाळी 7.00 वाजता जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50) ही मृतावस्थेत पडलेली दिसली. आईला वडिलांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.

गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या वेडगाव येथील लता दामोदर धुडसे (वय 40 वर्ष) यांच्यावर पतीनेच वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना दि. 16 फेब्रुवारीला मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही मुले गावातील शेतकऱ्यांकडे मजुरीसाठी कापसाची गाडी भरायला गेली होती.

बल्लारपूर शहरात तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सिनूच्या घरीच रक्ताच्या थारोळ्यात युवतीचा मृतदेह आढळला होता. महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौकातील घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. हि घटना शुक्रवारी 16 फेब्रुवारीला घडली. मृतक तरुणीचे नाव रक्षा कुमरे (22) रा. महाराणा प्रताप वार्ड, सम्यक चौक बल्लारपूर असे आहे. तर सिनू दहागावकर (29) असे आरोपीचे नाव असून, तो घटनेनंतर फरार झाल्याची माहिती आहे.

चंद्रपुर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अष्टभुजा वार्ड निवासी सुरजसिंह कुंवर (वय 25) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. सुरजसिंह कुंवर व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. शुक्रवारी दि. 16 फेब्रुवारी रात्री मृत सुरजसिंह कुंवर हा मित्रांसोबत दारूची पार्टी करीत होता. दरम्यान आपसात त्यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यांनतर आरोपीनी धारधार शस्त्राने सूरजची हत्या केली.
कोरपना तालुक्यातील लोणी गावातील मुलाने घरगुती वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. हि घटना 21 फेब्रुवारीला घडली. या हल्ल्यात आई कमलाबाई पांडुरंग सातपुते या जागीच ठार झाल्या असुन वडील पांडुरंग सातपुते हे गंभीर जखमी झाले आहेत. वडील पांडुरंग सातपुते ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे प्राथमिक उपचार दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे रेफर केले. आरोपी मुलगा मनोज सातपुते याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. कोरपना पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे


गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात सतत हत्येच्या घटना घडत असून, आतापर्यंत नागभीड, बल्लारपूर, चंद्रपूर , ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर, चंद्रपुर, कोरपना या ठिकाणी हत्येच्या घटना घडल्या आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात 8 हत्या झाल्याच्या घटनेनं अख्य चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर, गोंडपिपरी व बल्लारपूर शहरात एकाच दिवशी तीन हत्या झाल्या. या हत्येच्या मालिकांमुळे जिल्हा हादरून गेला असून, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात हत्या, चोरी, दरोडे, दुचाकी चोरी, अवैध दारू विक्री यासह अवैध विक्रीने डोके वर काढले आहे. नव्यानेच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यापुढे या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे आव्हान आहे. ही आव्हाने ते कशी पेलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने