चंद्रपूर:- काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख धम्मा निमगडे यांनी माहिती दिली आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" ही योजना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सर्व घटकातील महिलांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगायचे होते. ती पोस्ट डिलीट झाली आणि चुकीने "प्रतिभाताई लाडकी बहिण योजना" अशी पोस्ट प्रसारीत झाली." खरं सांगू इच्छितो, अशी पोस्ट चुकीने व्हायरल होत नाही. एखादा शब्द चुकीचा असू शकते. इथपर्यंत आपण मान्य करू शकतो. पण एखादी शब्दप्रयोग चुकू शकतो. पण थेट योजना चुकू शकते हे काही पटण्यासारखं नाही आहे. आणि काँग्रेसचा हा विषय असा आहे की, 8500 चा जो "खटाखट" वाला जुमला चालवला होता आणि त्यानंतर संविधान बदलणार हा जो नरेटिव्ह पसरवण्यात आला, या काँग्रेसने इथेच थांबलं नाही तर आता थेट "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावात सुद्धा बदल करून टाकले. म्हणजे हा प्रकार खरंतर जनतेला भ्रमित करण्याचा आहे. जनतेला मुर्खात काढण्यासारखा आहे. त्यांनी या प्रकरणांमध्ये जनतेची जाहीर माफी मागावी कारण आम्ही ज्या संस्कारात वागतो आमचे नेते आम्हाला सुद्धा सांगितले की, एकही माझी बहीण या योजनेतून वंचित राहावं नाही. यासाठी तुम्ही पूर्ण शक्तीने काम करा. सर्वांपर्यंत ही योजना पोचवा आम्हाला सुद्धा सुधीर भाऊंनी ही माहिती दिली. आदेश सुद्धा दिले, पण आम्ही कधी असा "सुधीरभाऊ मुनगंटीवार माझी बहीण योजना" असं कधी लिहिलं नाही, आम्ही "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" आम्ही तेच लिहिला आहे आणि भाऊंनी आम्हाला वारंवार सांगितलं आहे की, तुम्ही खोटं कधीही लिहायचं नाही, सत्याच्या आधारावर आपण प्रचार-प्रसार करायचं, प्रसारमाध्यमांमध्ये आपण जेव्हा लिहितो तेव्हा सत्याचा आधार घेऊनच लिहायचं, खोटं कोणाला बनवणे जनतेला फुकटचे प्रलोभन देऊ नये आणि जनतेची दिशाभूल करू नये हे आम्हाला सक्त आदेश असतात.
आमच्या नेत्यांने किंवा आमच्याकडून हीच जर चूक झाली असती तर, कदाचित मला पक्षातून बाहेर केले असते. आज पण हा प्रकार जो आहे हा हेतू परस्पर करण्यात आलेला आहे. कारण एखादी चूक ठीक आहे, एखादी शब्दप्रयोग चूक होतो, इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही थेट योजनेचे नाव बदलवता याला मी चूक मानत नाही, तरी माझी त्यांना आग्रह आहे जे प्रसिद्धी प्रमुख आहेत त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी आणि यापुढे असा खोटारडा प्रकार यांनी करू नये, कारण काँग्रेसमध्ये हा प्रकार चालतो हे आम्हाला सुरुवातीपासूनच माहित आहे. निगेटिव्ह पसरवणे, खोटे प्रलोभन देणे हे कुठपर्यंत चालणार आणि जनतेला कुठपर्यंत तुम्ही असे खोटं आश्वासन देणार. आम्ही संस्कारात वाढलेले लोक आहोत आमचे नेते आम्हाला संस्कार देतात की खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, सत्याचा आधार घेऊन पूर्ण माहिती पसरवायची खोटी माहिती पसरवायची नाही आम्ही नेत्यांचा आदर करतो आणि आम्ही यासाठी भाग्यवान आहो की आमचे नेते खोट्याचा आधार घेऊन असा प्रसार करायला आम्हाला आदेश देत नाही, त्यामुळे या प्रसिद्धीप्रमुखांनी जाहीर माफी मागावी अन्यथा योग्य वेळी तुमचा खोटारडेपणा जनतेसमोर आणू?.
राकेश कोंडबत्तुनवार
जिल्हा संयोजक
भाजपा सोशल मीडिया सेल चंद्रपूर
8275111999